T-Shirt printing business नमस्कार मित्रांनो आज एक नवीन व्यवसाय बद्दल आपण या आर्टिकल मध्ये माहिती पाहणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण टी-शर्ट वापरतो परंतु यावरील प्रिंटेड डिझाईन ही एक वेगळा आकर्षण असू शकते. आज सर्वात ट्रेडिंगला हा व्यवसाय सुरू आहे. प्रिंट ऑन डिमांड म्हणून एक या व्यवसायाकडे पाहिले जातात. यामध्ये होत असं की वेगवेगळ्या रंगाची टी-शर्ट तुमच्याकडे प्रिंटिंग साठी येतात, आणि त्याचे ठराविक चार्जेस घेऊन तुम्ही यातून भरपूर नफा कमवू शकता. हा व्यवसाय किती प्रकारे केला जाऊ शकतो. आणि यामधून कसा नफा कमवू शकता याची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहूया.
टी-शर्ट प्रिंटिंग
मित्रांनो टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय मध्ये एखादा गणेशोत्सव सार्वजनिक कार्यक्रम किंवा इतर कार्यक्रमांमध्ये तसेच पेट्रोल पंपावर एकाच लोगो प्रिंट करून किंवा एकच सारखे टी-शर्ट प्रिंट करायचे असतात, जराशी ऑर्डर तुम्हाला मिळाली तर तुम्ही प्रत्येक टी-शर्ट मागं शंभर रुपये प्रिंटिंग करून देऊ शकता. म्हणजेच एका टी-शर्ट प्रिंटिंग चे तुम्हाला शंभर रुपये मिळतील. याव्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या शहरामधील कपड्याच्या दुकानदारांना देखील तुम्ही टी-शर्ट प्रिंट करून देऊ शकता. T-Shirt printing business
टी-शर्ट ऑनलाइन विक्री
मित्रांनो टी-शर्ट प्रिंटिंग करून तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट मी शो अशा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्री करू शकतात. तुम्ही ज्या प्रकारे डिझाईन प्रिंट करणार आहात. त्या पद्धतीचे फोटो तुम्ही या प्लॅटफॉर्मवर अपलोड करा ज्यावेळी तुम्हाला याची ऑर्डर येईल त्यावेळी तुम्ही तो टी-शर्ट प्रिंटिंग करून देऊ शकता. आज काल याला बाहेरील देशांमध्ये खूप मागणी आहे. अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये आपल्या भारतामधून खूप साऱ्या प्रमाणात शर्ट एक्स्पोर्ट केले जातात. आपल्या इथे जर आपण एका प्रिंटेड शर्टची किंमत शंभर रुपये घेत असो तर तीच बाहेरील देशांमध्ये 700 ते 800 रुपये किंमत मिळते, म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या इथे जी शंभर रुपयाला टी-शर्ट मिळतो तोच आपण बाहेर देशामध्ये 800 ते हजार रुपयांमध्ये विक्री करू शकतो. T-Shirt printing business
विक्री वाढवण्यासाठी पद्धत
विक्री वाढवण्यासाठी तुम्ही तुमचे सोशल मीडिया पेजेस बनवू शकता ऑनलाइन नेटवर्क वाढवू शकता. आपल्या शहरांमध्ये जास्तीत जास्त जाहिरात देऊ शकता लोकल न्युज पेपर तसेच शहरांमधील इंस्टाग्राम मॉडेल तसेच रील स्टार आहे त्यांना प्रमोशन देऊन तुम्ही हा व्यवसाय वाढवू शकता. T-Shirt printing business
व्यवसाय उघडण्यासाठी गुंतवणूक
T-Shirt printing business टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या मशनरी घेण्यासाठी किमान दोन लाख रुपये खर्च लागेल ज्यामध्ये प्रिंटिंग मशीन स्टिकर लॅपटॉप या प्रकारचे साहित्य तसेच कच्चामाल खरेदी करावा लागेल. हे मशनरी तुम्हाला इंडियामार्ट वेबसाईटवर ऑनलाईन मिळून जातील याची सेलर इंडिया मार्ट वेबसाईटवर अवेलेबल आहेत.
सर्वसाधारणपणे जेव्हा पूर्णपणे शर्ट तयार होतो, तेव्हा तुम्हाला एका तिखट मागे 70 रुपये निव्वळ नफा राहतो.