Nursery Business नमस्कार मित्रांनो रोपवाटिका व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल आपण या पोस्टमध्ये माहिती पाहणार आहोत. नर्सरी व्यवसायाबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची खूप दिवसापासून इच्छा असेल, परंतु सोशल मीडियावर गुगलवर आणि युट्युब वर कोणत्याही प्रकारची जास्तीत, माहिती उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली नाही. मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप यामध्ये माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये तुम्ही सुरुवात कशी करू शकता. How to Start a Nursery Business यामधून कमाई किती करू शकता. Nursery Business व्यावसायिक कसा चालतो मार्केटिंग कशी करावी जागेचे नियोजन लागणारी कागदपत्रे, product कोठून खरेदी करायचा भांडवल आणि एक यशस्वी व्यवसायाकडे वाटचाल कशी करायची या सर्व गोष्टींचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे ही बातमी शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा
नर्सरी रोपवाटिका व्यवसाय || Nursery Business Overview
मित्रांनो रोपवाटिका व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये म्हणजेच माझ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये याला मागणी कशी आहे. हे पाहिले पाहिजे तुमच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये हा व्यवसाय अगोदर कोणी करत आहे. का त्यांचा व्यवसाय योग्य चालत आहे. का तसेच छोटे मोठ्या प्रश्नांचा विचार करणे या मध्ये अत्यावश्यक ठरते. तुम्ही सुरुवातीला रोपवाटिका व्यवसायामध्ये कोणत्या प्रकारची रोपे ठेवणार आहेत. याचा विचार करा तुम्ही रोपवाटिका मध्ये जर शेतातील भाजीपाला इत्यादी प्रकारची रोपे ठेवत असाल तर त्यामध्ये तुमचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे फळबागांची रोपे दुसरा म्हणजे भाजीपाला व तिसरा म्हणजे नारळाची झाडे आंब्याची झाडे व त्यामध्ये इतरत्र गोष्टी येतात. त्यामध्ये तुम्हाला निवडणे गरजेचे आहे. की तुम्ही कोणता व्यवसाय करू इच्छिता. Nursery Business
नर्सरी व्यवसाय कसा सुरू करावा Start a Plant Nursery?
तुम्ही हा व्यवसाय तुमच्या शेतामध्ये , पॉली हाऊस तयार करून हा व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. जसे की जेथे ऑलरेडी हा व्यवसाय सुरू आहे. त्या ठिकाणी व्हिजिटिंग करणे याव्यतिरिक्त तुम्ही ज्या प्रकारची रोपे लावत आहात. Nursery Business त्यांची बाजारांमधील मागणी आवक या सर्व गोष्टींचा विचार तुम्ही केला पाहिजे, या व्यतिरिक्त तुमचे शहराच्या मुख्य ठिकाणी किंवा मुख्य रस्त्याच्या बाजूला हे पॉलिहाऊस असावे आणि ऑर्डर स्वीकारण्यासाठी तुमचे एखादे ऑफिस असावे ज्या ठिकाणी लोक आल्यावर बसण्याची सुविधा वगैरे असावी.
रोपांची निवड कशी करावी Plant nursery startup costs
मित्रांनो जर तुम्ही फुलाच्या नर्सरीचा व्यवसाय करत असाल तर तुम्ही फुलांमध्ये जे जास्त फुले वापरली जातात. त्यांची रोपे लावू शकता त्याचबरोबर जर तुम्ही फळांच्या रोपांचे लागवड करत असाल, Fruit Nurseries तर त्यामध्ये तुम्ही आंबा, संत्री, नारळ, चिकू इत्यादी लोकांना खरेदी करायला आवडतील अशी फळे लावावीत, याव्यतिरिक्त रोपवाटिका नर्सरी मध्ये तुम्ही अशा रोपांची निवड करा, की जी तुमच्या एरियामध्ये शेतकरी लावत असतील ज्यांची लागवड दिवसेंदिवस जास्त आहे. तसेच तुम्ही ऑर्डर प्रमाणे याची रोपे तयार करून देऊ शकता. थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुम्हाला या आर्टिकल पेक्षा अधिक ची माहिती तुमच्या जवळच्या नर्सरी रोपवाटिकांमध्ये मिळेल. Nursery Business
रोपवाटिका व्यवसायामध्ये जागेची निवड
रोपवाटिका नर्सरी अशा जागेमध्ये तयार करा ज्या ठिकाणी तुम्हाला मालवाहतूक करण्यासाठी सोपी जाईल. आणि लोकांचा तुमच्या सोबत संपर्क राहील, अशा ठिकाणी निसर्ग रम्य वातावरणात रोपवाटिका तयार करा.
रोपवाटिका साठी बियाणे खरेदी buying
नर्सरी व्यवसायासाठी बिया व रोपे घेण्यासाठी कृषी विभाग सर्वात चांगला पर्याय आहे. तसेच तुम्ही खाजगी बियाणांच्या दुकानातूनही या बिया खरेदी करू शकतात.
रोपवाटिका भांडवल costing
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जर जागा तुमची स्वतःची असेल तर दोन ते तीन लाख रुपये सुरुवातीला गुंतवावे लागतील आणि जर तुम्ही हा व्यवसाय जागा विकत घेऊन करत असाल तर तुम्हाला यामध्ये बरीच अशी गुंतवणूक लागू शकते. आणि यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची नर्सरी ओपन करत आहात त्यावरही अवलंबून असते. Plant nursery startup costs
व्यवसाय मधून होणारा प्रॉफिट Is plant nursery profitable?
या व्यवसायामधून तुम्ही महिन्याला चांगली कमाई करू शकता. जर तुम्ही रोपवाटिका नर्सरी तयार केली आणि जर तुम्हाला एक लाख रोपांची ऑर्डर मिळाली तर तुम्ही त्यामागे 75 हजार रुपये कमवू शकता. मग त्यामधील तुमचा खर्च वगैरे जाऊन तुम्हाला खाली कमाई मिळते. अजून सांगायचं झालं तर कमी इन्वेस्टमेंट मध्ये हा चांगला व्यवसाय आहे. Is plant nursery profitable?
मार्केटिंग Marketing of Plant Nursery
तुम्ही तुमच्या लोकल न्युज पेपर ला याची जाहिरात देऊ शकता. किंवा सोशल मीडियावर इंस्टाग्राम फेसबुक इत्यादी सोशल मीडियाचा वापर करून तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करू शकता. एकदा तुमच्या कस्टमर बेस परफेक्ट झाला की त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ऑर्डर येण्यास सुरुवात होते.