Electric Charging Station Dealership भारतामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिला गेला तर इलेक्ट्रिकल वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे पेट्रोल किंवा डिझेल वाहनांसाठी पर्यावरणास अनुकूल आहे. यापासून कोणत्याही प्रकारचा प्रदूषण किंवा इतरत्र प्रदूषण होत, नाही हे कमी किमतीमध्ये जास्त अंतर चालणारे वाहन म्हणजे इलेक्ट्रिक वाहन आहे, मोटार बाईक फोर व्हीलर कार या व्यतिरिक्त एसटी महामंडळामध्ये इलेक्ट्रिक बसेस देखील आलेल्या आहेत. आणि टाटा कंपनीने इलेक्ट्रिकल ट्रक लॉन्च केले आहे मग याची दैनंदिन वाटचाल पाहता तुम्ही विचार करू शकता. की इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन किती महत्त्वाचे होऊ शकते.
ज्याप्रमाणे सुरुवातीच्या काळामध्ये पेट्रोल डिझेल या इंधनांचा तुटवडा असायचा, म्हणजे जुन्या काळामध्ये किंवा दहा वर्षांपूर्वी पेट्रोल पंपाची संख्या खूप कमी होती जसजसं वाहनांचे प्रमाण वाढत गेलं, त्याप्रमाणे पेट्रोल पंपही वाढत गेले. त्याचप्रमाणे अजून सुद्धा इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन सुरू केले, तर हे तुम्हाला फायद्यात घेऊन येऊ शकतात. तर चला मग आपण या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. Electric Charging Station Dealership
चार्जिंग Charging
हे 480 होल्ट डायरेक्ट करंट डीसी लग वापरून 20 ते 30 मिनिटात 80% पर्यंत बॅटरी चार्ज करू शकते, तथापि ते सर्व ईव्हीसी सुसंगत नाही हे फक्त सार्वजनिक चार्जिंग स्टेशनमध्येच प्रस्थापित केले जाऊ शकते. भारतात ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या स्थापनेबद्दल भारताच्या केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये भारत सरकारने अवजड वाहनांसाठी शहरांमध्ये दर तीन किमी महामार्गावर पंचवीस किमी आणि 100 किमी अंतरावर ईव्ही चार्जिंग स्टेशन प्रस्थापित करणे अनिवार्य केले आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे पेट्रोल पंप उभारण्यासाठी ठराविक लिमिट असायचे त्याच पद्धतीने चार्जिंग सेशन उभारणीसाठी भारत सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर भारत सरकारने ऊर्जा मंत्रालय भारताच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करून भारतात, ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीसाठी पुरावा मुक्त केला आहे. म्हणजे यामध्ये कोणताही व्यक्ती सहभाग नोंदवू शकतो.
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आवश्यक कागदपत्रे
- भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे
- वय वर्ष 21 ते 60 वर्ष असावे
- शैक्षणिक पात्रता दहावी पास
आधार कार्ड पॅन कार्ड किंवा बँक खाते - रहिवासी प्रमाणपत्र
- जमीन खरेदी करणे किंवा मालकाचे भाड्याने दस्तावेज
- स्थानिक प्राधिकरणाकडून एनओसी
- ही मुख्य कागदपत्रे तुम्हाला लागतील
मी चार्जिंग स्टेशन आवश्यक सुविधा
ट्रांसफार्मर असणे आवश्यक आहे. अकरा केवी केबल्स आणि लाईन व मीटर संबंधित उपकरणे असावीत नागरिकामे आणि आस्थापना वाहने चार्जिंग करण्यासाठी आणि वाहनांच्या प्रवेशासाठी किंवा बाहेर, पडण्यासाठी जागा असावी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मानकाद्वारे मजूर सर्व चार्जर मॉडेल्सची व्यवस्थापना असावी दोन ते तीन कर्मचारी असावेत एक कुशल आणि एक अकुशल.
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन मध्ये होणारा फायदा
मायलेज चार्जिंग पॉइंट आणि विजेचे शुल्क यावर अवलंबून असते, यामध्ये अंदाजे तुम्हाला प्रति युनिट तीन रुपये फायदा होऊ शकतो. तुम्ही 45 मिनिटात एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 90 रुपये पर्यंत कमवू शकता, तीन चार्जिंग पॉईंट्स दैनंदिन कमाई सरासरी 3000 रुपये होऊ शकते. याच व्यतिरिक्त मासिक कमाई 90 हजार रुपये सरासरी होऊ शकते, अतिरिक्त तुमचा खर्च यामधून जाऊ शकतो.
चार्जिंग स्टेशन उभारण्याचे फायदे
चार्जिंग स्टेशनच्या स्थापनेची संबंधित फायदे पाहायला गेल्यानंतर, अजूनही भारतामध्ये हे स्टेशन हवे तेवढे उभारण्यात आले नाहीत. सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही इलेक्ट्रिक स्टेशन स्थापन केले तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा फायदा होऊ शकतो. कमी कॉम्पिटिशनमध्ये जास्त उत्पादन मिळवण्यासाठी हे योग्य आहे.
तर मित्रांनो ही होती इन्फॉर्मेशन तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला अशीच माहिती पाहायला मिळेल.