LED बल्ब निर्मिती व्यवसाय मराठी || LED Bulb Manufacturing Business

LED Bulb Manufacturing Business : नमस्कार मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये एलईडी बल्ब व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. एलईडी बल्ब ही एक उत्तम व्यवसायाची प्रक्रिया आहे. हा व्यवसाय करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. आपण यामधील ूप सार्‍या गोष्टींची सविस्तर चर्चा करणार आहोत. यामध्ये तुम्हाला कमाई किती होऊ शकते ,फायदा कसा होऊ शकतो. मार्केटिंग कशी बनवू शकता, व्यवसायासाठी लागणारी जागा येणारा खर्च एलईडी बल्ब चे फायदे लागणारे साहित्य मशिनरी प्रॉफिट या सर्व गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याकरिता ही बातमी शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा.

प्रॉफिटेबल एलईडी बल्ब व्यवसाय

मित्रांनो एलईडी बल्ब हा सर्वसामान्य बल्प पेक्षा कमी वीज वापरतो म्हणून एलईडी बल्ब ला जास्त मागणी आहे. मार्केटमध्ये नामांकित कंपन्या असताना सुद्धा घरगुती तयार केलेले किंवा आपल्या महाराष्ट्रात तयार झालेले एलईडी बल्ब लोक सध्या वापरत आहेत.

एलईडी बल्ब बाकीच्या बल्बच्या तुलनेत दुप्पट प्रकाश देतो आणि एलईडी बल्ब ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये दुकानदारांकडून देखील या LED बल्ब ला चांगली मागणी आहे.

एलईडी बल्ब मेकिंग प्रोसेस

जर तुम्ही एलईडी लाईट बनवण्याचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर तुम्ही त्यासाठी एलईडी लाईट मेकिंग कोर्स देखील करू शकता. भारतामध्ये अशा प्रकारचे बरेचसे प्रशिक्षण केंद्र युनिव्हर्सिटी उपलब्ध आहेत. जे या प्रकारचे कोर्सेस देत आहेत. याव्यतिरिक्त प्रशिक्षण केंद्रांमध्ये देखील हा कोर्स तुम्हाला शिकवला जातो, अगदी बेसिक इन्फॉर्मेशन पासून ते डीप मध्ये प्रशिक्षण दिले जाते.

व्यवसायासाठी लागणारी जागा

एलईडी बल्ब हा एक लघु उद्योग असल्याने घरबसल्या बल व्यवसायाच्या आधारे तुम्ही तयार करू शकता. तुम्ही हे तुमच्या घरातूनच सुरू करू शकता, यासाठी तुम्हाला दहा बाय पंधरा स्क्वेअर फुट जी खोली असावी ज्यामध्ये मशीन बसवून तुम्हाला काम करता, येईल आणि तेवढ्याच जागेत स्टोअर मसावी च्या मध्ये तयार झालेले बल्ब तुम्हाला ठेवता येतील जसं जसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जागेची वाढ करू शकता.

लागणारा खर्च

हा व्यवसाय सुरू करताना, तुमच्याकडे जास्त बजेट नसेल तर तुम्ही हा व्यवसाय कमीत कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करू शकता. कमीत कमी म्हणजे कमीत कमी तुम्ही एक लाखापर्यंत गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करू शकता. ज्यांचा बजेट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी पाच ते दहा लाख रुपयांची गुंतवणूक करून विविध मोठ्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करू शकता. त्याचबरोबर व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये रेटीफियर मशीन हिट सिंग डिवाइस मेटल लीग कॅप होल्डर प्लास्टिक बॉडी कनेक्टिंग वायर सोल्डरिंग फ्लक्स हे आवश्यक साहित्य तुम्हाला लागेल.

व्यवसायासाठी लागणारा परवाना

एलईडी बिजनेस प्लॅन सुरू करण्यासाठी पहिला परवाना, जीएसटी क्रमांक मिळवण्यासाठी असेल त्यानंतर तुम्हाला तुमची ट्रेडमार्क नोंदणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून जेव्हा तुमचा व्यवसाय चांगला सुरू होईल, तेव्हा इतरत्र कोणी तुमच्या ब्रँडच्या नावाखाली हा धंदा ओपन करणार नाही.

एलईडी बल्ब व्यवसायातून होणारा प्रॉफिट

एलईडी बल्ब व्यवसायामध्ये जर तुमची उत्पादने वेळेवर योग्य दराने विकली तर यामध्ये नफ्याचे प्रमाण खूप जास्त आहे. तुमच्या खर्चाच्या 30 टक्के जास्त तुम्हाला नफा मिळू शकतो तुम्ही हा व्यवसाय अगदी कमीत कमी भांडवलत सुरू करू शकता. आणि जर तुम्ही शंभर रुपयाला एक वस्तू विकली तर त्याच्या खर्चातून तुम्हाला 130 ते 140 रुपये मिळू शकतात.

तर मित्रांनो ही होती एक छोटीशी माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला असेच अपडेट्स मिळत राहतील.

Leave a Comment