मिनरल वॉटर प्लांट व्यवसाय बद्दल माहिती || Mineral Water Plant business

Mineral Water Plant business मिनरल वॉटर प्लांट व्यवसाय बद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपण जे दैनंदिन जीवनामध्ये शुद्ध पाण्याची बॉटल वापरतो, बाहेर प्रवासादरम्यान पाण्याची बॉटल घेतो, ते मिनरल वॉटर आहे. हे पाणी एक लिटर बिसलेरी मध्ये अर्धा लिटर बिसलरी मध्ये किंवा पाऊस बाकी मध्ये बाजारात विकले जाते, त्याचप्रमाणे पाच लिटर तीन लिटर सात लिटर दहा लिटर या प्रकारचे वेगवेगळे पॅकिंग बाजारामध्ये अवेलेबल आहेत. सध्या आजच्या युगात आपण जी बॉटल वापरतो ती एक लिटर पाण्याची बॉटल आहे. प्रवासादरम्यान आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याची जाणीव भासते त्या ठिकाणी आपण बिसलरी घेतो,

मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या कंपनी Branding and marketing

मार्केटमध्ये पाहायला गेलं तर बिसलरी, रॉयल सेवन, सनरीच, यश रिच, बेली बिसलरी, नाथ जल अशा वेगवेगळ्या कंपन्या कार्यरत आहेत, याव्यतिरिक्त मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्या पाहून तुम्ही काम करू शकता. सुरुवातीच्या काळामध्ये बिसलरी हा ब्रँड सुरू झाला होता, आणि ह्या बिसलरी नावामुळे आज आपण कुठेही बाहेर गेलो तर बिसलरी हा शब्द आपण वापरतो, आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखादा दुसरा बिसलरी प्लांट तयार आहे. परंतु अजूनही या काळामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता.

व्यवसायासाठी जागेची निवड

मित्रांनो तुम्हाला हा व्यवसाय उभा करण्यासाठी अशी जागा निवडावी लागेल, जिथे पाण्याची पातळी जास्त असेल, वाहतुकीची संसाधने सहजपणे उपलब्ध होतील, वीज उपलब्ध असेल पाणी असेल स्वच्छ वातावरण असेल जेणेकरून तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही, जर तुम्ही हा व्यवसाय ग्रामीण भागात करण्याचा विचार करत असाल तर असे होऊ शकते की तुमच्या आसपास शहरात जास्त पाणी असेल, पण वातावरण स्वच्छ असायला हवे जेणेकरून येणाऱ्या समस्येचा सामना करावा लागणार नाही,

जर तुम्ही हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये करण्याचा विचार करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला वाहतुकीचा खर्च येऊ शकतो परंतु वातावरण आणि पाण्याचा परवाठा ज्या ठिकाणी स्वच्छ असेल त्या ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. माझ्या मते तुम्ही हा प्लान शहराच्या बाहेर निसर्गरम्य वातावरणामध्ये सुरू केला पाहिजे या व्यवसायापासून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

वॉटर प्लांट साठी लायसन्स license

या व्यवसायाची तुम्हाला तुमच्या नगर परिषदेमध्ये सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल, यानंतर तुम्हाला जीएसटी नोंदणी करावी लागेल. या व्यतिरिक्त भारतात पॅकेज ड्रिंकिंग वॉटर बिजनेस प्लांट लावायचा असेल, तर तुम्हाला बी आय एस प्रमाणपत्रानुसार आय एस आय परवाना देखील घ्यावा लागेल.

व्यवसायासाठी मशिनरी

मित्रांनो व्यवसायासाठी तुम्हाला वॉटर बोरिंग आरटीओ, मशीन आणि चीलिंग मशीन, कंटेनर जार, स्टिकर्स, बॉटल, पाऊच पॅकिंग मशीन, जनरेटर बॉटल पॅकिंग मशीन या मशीन लागतील, हे मशीन तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक आणि मुंबई या ठिकाणाहून खरेदी करू शकता याव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात मध्ये राजकोट आणि सुरत या ठिकाणी देखील याचे सप्लायर्स अवेलेबल आहेत.

व्यवसायासाठी येणारा खर्च

तुमचा प्लांट जितका मोठा असेल तितका खर्च जास्त असेल तरीही तुम्ही जर आर‌ओ प्लांटचा व्यवसाय सुरू करत, असाल तर त्यासाठी सुमारे दोन ते तीन लाख रुपये लागतील. आणि जर तुम्ही संपूर्ण ऑटोमॅटिक प्लांट सेटअप करू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला 25 ते 30 लाखाची गरज लागू शकते. आणि हो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला विजेचे सेपरेट कनेक्शन घ्यावे लागते.

व्यवसाय मधून होणारा प्रॉफिट profit margin

एवढ्या खर्चात हा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही दिवसाला दहा हजार वॉटर विक्री केली तर 50 हजार रुपये प्रति दिवसाला तुम्ही कमवू शकता. ज्या पद्धतीने तुम्ही विक्री करता, त्या पद्धतीने तुमचा प्रॉफिट वाढू शकतो. जास्त करून याची गरज उन्हाळ्यामध्ये भासते आणि त्यावेळी याचा सप्लाय मोठ्या प्रमाणात करावा लागतो. तुम्हाला हा व्यवसाय नक्कीच एका वर्षामध्ये प्रॉफिटेबल बनवू शकतो. तर ही इंफॉर्मेशन कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या जेणेकरून त्या ठिकाणी असेच अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील.

Leave a Comment